Wednesday, September 12, 2018

जाधववस्ती (कुंभारी) शाळेचे इंग्लिश ऱ्हाइम्स स्पर्धेत यश

जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय इंग्लिश ऱ्हाइम्स स्पर्धेत जाधव वस्ती (कुंभारी) ता.जत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संचामध्ये कु. श्रेया संतोष जाधव, कु.सानवी दत्तात्रय जाधव, कु. समीक्षा रवींद्र जाधव, कु.आर्या अनिल जाधव, कु. रोहिणी जोतीराम जाधव व श्रेयस दत्तात्रय साळुंखे  या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या विद्यार्थ्यांना भगवान नाईक, नानासाहेब शिंदे, दिलीप वळवी या शिक्षकांनी तसेच केंद्रप्रमुख फत्तू नदाफ यांनी मार्गदर्शन केले.गटशिक्षणाधिकारी बी.एन.जगधने, शिक्षण विस्तारअधिकारी आर.डी.शिंदे, तानाजी गवारी यांचेही मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment