जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटनेच्या जत शाखेच्यावतीने 2 ऑक्टोबर रोजीच्या पेन्शन दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी जत तालुक्यात 'संपर्क फॉर समर्थन अभियान' राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जत तालुका संघटनची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पेंशन दिंडी प्रचार व प्रसार मोहीम मोठ्या जोमाने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.संपर्क फॉर समर्थन,संघटन आपल्या दारी इत्यादी उपक्रम राबवण्याचा निर्णय झाला.यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सर्व dcps धारक बंधू भगिनी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून आपला जुन्या पेंशन च्या लढा तीव्र करण्यासाठी या लढ्यात सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
No comments:
Post a Comment