आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये.
रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून
टाकावे. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी
बोलणे चालू ठेवावे; पण रुसवाफुगवा, अबोला
फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती
रात्रीपर्यंत मिटवावी. देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडला
तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळभ राहत नाही; पण रुसून
झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असे नाही. शरीराला आराम मिळाला
तरी मन अप्रसन्नच राहते. यात महत्त्वाचा प्रश्न हाच राहतो की यात माघार कुणी घ्यायची? तर ज्याला सुखी
व्हायचे आह त्याने पहिली माघार घ्यावी. अहंकार ही सर्व नात्यांना
सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार
करावा. यातील मजा ज्याला समजली तो खर्या
अर्थाने आत्मिक शांततेकडे जाणारी आणखी एक पायरी चढला.
********************
प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस
चुकीचा असतोच असे नाही किंवा असेही नाही की तो कमजोर आहे. फरक
इतकाच असतो की, त्याला स्वत:च्या
‘इगो’ पेक्षा नाती जपत असताना एक पाऊल मागे का
होईना येण्यात कमीपणा अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही. माणसे कमविण्यात जो आनंद आहे, तो पैसा कमविण्यात नाही...
****************
वाळूमध्ये
पडलेली साखर मुंगी खाऊ शकते परंतु हत्ती नाही. म्हणून छोट्या
माणसांना कधी छोटे समजू नका. कधी कधी छोटी माणसे सुद्धा मोठी
मोठी काम करून जातात.
***********************
मुंबईकर
: काय हो, तुमच्याकडे आमच्यासारख्या ईस्ट वेस्ट
अशा पाट्या का नसतात?
पुणेकर : एकतर आमचे दिशाज्ञान
चांगले आहे आणि दुसरे म्हणाल तर आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा असते.
No comments:
Post a Comment