Thursday, September 20, 2018

शिक्षक भारतीच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवणार: महेश शरनाथे

जत,(प्रतिनिधी)-
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक भारती कटीबद्ध असून शिक्षकांनी आपले प्रश्न शिक्षक भारतीच्या पदाधिकारींकडे द्यावेत, असे मत शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे यांनी उमदी (ता.जत) येथे व्यक्त केले.
 उमदी येथे नुकताच प्राथमिक शिक्षकांचा मेळावा पार पडला.यावेळी मार्गदर्शन करीत असताना श्री. शरनाथे बोलत होते. ते पुढे म्हणाले, शिक्षक आमदार कपील पाटील व राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिक्षकांचे प्रश्न सोडविले जात आहेत. काही प्रश्नांचा पाठपुरावा सुरु आहे. सांगली  जिल्ह्यात सर्वच प्रश्नांमध्ये शिक्षक भारती आघाडीवर असून सामुहिक प्रश्नांबरोबर शिक्षकांनी वैयक्तिक प्रश्न सांगावेत. मेडीकल बीले, फंड प्रकरणे तसेच इतर वैयक्तिक कामासाठी कोणीही आर्थिक खर्च करण्याची गरज नाही. त्यासाठी शिक्षक भारती पदाधिकारी यांना आपली कामे सांगा ती कामे विनामोबदला करुन दिली जातील,असेही महेश शरनाथे म्हणाले.
शिक्षक भारतीने राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर केलेल्या कामाचा आढावा शिक्षकांना सांगितला.1 नोव्हेबर 2005 पूर्वीच्या रक्कमा स्थायी प्रस्ताव, हिंदी मराठी भाषा सूट तसेच विविध प्रश्न यावर चर्चा झाली.
 शिक्षक बँकेबाबत सभासद जागृती अभियान शिक्षक भारतीकडून राबविले जात आहे. प्रत्येक सभासदाने बँक समजून घेणे आवश्यक आहे. बँकेतील चुकीच्या कामकाजावर व सभासदांवर होणाऱ्या अन्यायाबाबत चर्चा करणेत आली. सत्ता कोणाची यापेक्षा सभासदाभिमुख कारभार महत्वाचा आहे. मयत फंड, व्याज व मयतसभासद कल्याण ठेव यातून मयत सभासदांच्या वारसाला सरसकट २० लाख कसे देता येतात, याबाबत माहिती देण्यात आली
     शिक्षक भारती च्या चांगल्या कामाबद्दल जत पूर्व भागातील शिक्षकांनी जिल्हा अध्यक्ष महेश शरणाथे यांचा सत्कार करणयात आला.जत तालुक्याचा  शैक्षणिक कामकाजाचा आढावा तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत यांनी घेतला.यावेळी श्री. साळुंखे, अविनाश सुतार, मल्लय्या नांदगाव , श्री.डफळापुर, सातपुते, होनमुखे  ,पाथरट, हत्तळ्ळी  आदी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment