Saturday, September 15, 2018

शेगाव येथे बेकायदा दारूसाठा जप्त


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील शेगाव येथे राज्य उत्पादन शुल्कच्या सांगलीच्या पथकाने छापा टाकून बेकायदेशीर दारूसाठ्यासह दोन वाहने ताब्यात घेतली. कारवाईत आठ लाख 69 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राजेंद्र प्रल्हाद गुदळे (वय 33,रा. काशिलिंगवाडी), बसवराज अर्जुन व्हनखंडे (33, रा. बाळेगिरी ता. अथणी) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, विदेशी मद्याचा वाहतूक पास नसल्याने शेगावमधील हॉटेल रायगड व रजिस्टर नसल्याने शेगावमधील चौगुले देशी दारू दुकान आणि जतमधील बामणे दारू दुकानांवरही कारवाई करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, शेगाव येथील हॉटेल रायगडसमोर राजेंद्र गुदळे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक टेम्पो, देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या असा दोन लाख 23 हजार 122 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तेथेच बसवराज व्हनखंडे यालाही अटक करण्यात आली.त्याच्याकडून एक टेम्पो, देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या असा सहा लाख 46 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ऐगावमधील हॉटेल रायगड, चौगुले देशी दारू दुकानावरही कारवाई करण्यात आली. जत मधील बामणे देशी दारू दुकानावरही कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्कच्या अधिक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद पवार, उमेश निकम,युवराज कांबळे, करण सरवदे, स्वप्निल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment