जत,(प्रतिनिधी)-
“जीवन शांति’’मध्ये सुरूवातीलाच
पेंशन किती मिळणार आहे हे सांगण्यात आले आहे. सुनिश्चित दराने पेंशन देण्याची हमी हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. विविध 9 प्रकारच्या पेंशन पर्यायमधून ग्राहकांना त्यांच्या
पसंतीचा पर्याय निवडता येईल. प्रलंबित पेंशन योजनेमध्येदेखील
विलंबित काळ सुनिश्चित राशी मिळण्याची सोय आहे. या पॉलिसीत जॉइंट लाइफचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. एकाच
पॉलिसीत स्वत: व दुसर्या निवडलेल्या व्यक्तीला
तहहयात पेंशन मिळण्याचा पर्याय या पॉलिसीत उपलब्ध करून दिला आहे. मात्र यासाठी दुसर्या निवडलेल्या व्यक्तीचे वय किमान
30 वर्षे असणे आवश्यक आहे. प्रथम पेंशन धारकाचा
मृत्यु झाल्यावर निवडलेल्या व्यक्तीस तहहयात पेंशन व अशा दुसर्या व्यक्तीच्या मृत्युनंतर वारसदारास मूळ गुंतवणूक रकमेच्या किमान
110% इतकी रक्कम दिली जाईल. या योजनेमध्ये पॉलिसी
सुरू झाल्यावर 1 वर्षानंतर कर्जाची सोय उपलब्ध आहे. ही योजना दिव्यांग तसेच राष्ट्रीय पेंशन योजनासाठी सुद्धा किमान रु.
50,000/- एक रकमी गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment