जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील जत व संख शाखेमध्ये शिक्षकांना कर्जे काढताना घेतली जाणारी 'एनओसी' बंद करुन सभासदांना नाहक होणारा त्रास थांबवावा, असे मत शिक्षक भारती जत तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी केले. उमदी (ता.जत) येथे शिक्षकांच्या बैठकीत बोलत होते.
प्राथमिक शिक्षक बँकेत सर्वात जास्त कर्ज जत तालूक्यातील आहेत कर्जदार सभासदाला कर्ज घेताना शिक्षक पतसंस्था व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले जात आहे. परिणामी संबधित शिक्षक सभासदाला हेलपाटे मारुन 'एनओसी' आणावी लागते, त्याचा नाहक त्रास झाल्याने सत्ताधारी संचालक मंडळावर सभासदांचा रोष आहे, असे श्री.सावंत यांनी म्हटले आहे.
वास्तविक पगार कपात करुन पगारातून वसूली घालण्याचा पहिला अधिकार शिक्षक बँकेला असताना 'एनओसी' घेऊन सभासदांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याचे कारण काय? असेही दिगंबर सावंत म्हणाले. शिक्षकांच्या पगारातून कपाती करण्याचे अधिकार शिक्षक बँक शिक्षकांच्या बाबतीत उदासिन असल्याचे दिसत आहे. अपवादात्मक शिक्षकांची खाती तपासून 'एनओसी' आवश्यक त्यांचीच घ्या सरसकट सर्वांना त्रास देऊ नका. कर्जाचा व्याजदर कमी करावा जनरल सभेमध्ये शिक्षक भारती सरचिटणीस यांनी व सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरे द्यावीत. शिक्षक बँकेत सध्या केलेली नोकरभरती रद्द करावी. सत्ता कोणाची आहे, पेक्षा ती सभासदाभिमुख कारभार करणारी असावी,असे मत दिगंबर सावंत यांनी व्यक्त केले.
यावेळी शौकत नदाफ, मल्लया नंदगाव, अविनाश सुतार, नवनाथ संकपाळ, भाऊसाहेब महानूर, बाळासाहेब सोलनकर, दयानंद रजपूत यांच्यासह शिक्षक भारतीचे जिल्हा व तालूका पदाधिकारी उपस्थित होते.
जबरदस्त काम दिगंबर सर, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा पहिला आवाज
ReplyDeleteलगे रहो...
ReplyDeleteपगार पत्रक घ्या त्यात कपातीची माहिती असतेच ना
ReplyDelete