जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील खलाटी येथील एका तीस वर्षीय तरूणाचा
डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खंडू सिध्दू नाईक (वय-30) असे
मयत तरूणाचे नाव आहे. याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खलाटी
ग्रामपंचायतीसमोर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची इमारत आहे. या शाळेच्या
व्हरांड्यात खंडू शुक्रवारी रात्री दारूच्या नशेत झोपला होता. सकाळी
खंडूच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी
पुढे जाऊन पाहिले असता खंडूच्या डोक्यात मोठा दगड घालण्यात आला होता. त्यामु़ळे
रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मुत्यू झाला असल्याचे या लोकांच्या लक्षात
आले. या गावातील नागरिकांनी पोलिस पाटील भाऊसाहेब शेजूळ यांना याची माहिती
दिली.त्यांनी जत पोलिसात वर्दी दिली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट
देऊन पंचनामा केला. गावातील जुन्या वादातून खंडूचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज
पोलिंसानी व्यक्त केलेला आहे. त्या दिशेने तपास सुरू असून काही जणांना पोलिसांनी
चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
No comments:
Post a Comment