सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या जनरल रजिस्टरसह
महत्त्वाच्या रेकॉर्डचे स्कॅनिंग करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये नाविन्यपूर्ण
उपक्रमांतर्गत आवश्यक असणार्या निधीची तरतूद करण्याची मागणी
पालक वर्गांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शाळेचे जनरल रजिस्टर
हे महत्त्वाचे व कायमस्वरूपी रेकॉर्ड ठेवले जाते. ज्यामध्ये
विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीखव जातींची नोंद असते. त्यावरूनच विविध शैक्षणिक दाखले देण्यात येतात, परंतु
जिल्हा परिषद शाळांतील सर्वच जनरल रजिस्टर जीर्ण झाली आहेत. हे
रजिस्टर हाताळताना कागदपत्रे फाटतात तसेच काही नोंदी देखील अस्पष्ट आहेत. यांवरून दाखले देताना जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात. त्यामुळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील जे कायमस्वरूपी रेकॉर्ड ठेवले जाते. त्या सर्व रेकॉर्डचे स्कॅनिंग करून ठेवणे आवश्यक झाले आहे.
जिल्हा
परिषद शाळांमधील सर्व रेकॉर्ड स्कॅनिंग करण्याचे काम व्यापक स्वरूपाचे असल्याने जिल्हा
परिषदेने अर्थसंकल्पामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रमातंर्गत या योजनेचा समावेश करावा.
तसेच त्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात यावी. याच
धर्तीवर जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली ग्रामपंचायत, प्राथमिक
आरोग्य केंद्र किंवा इतर संस्थांमध्ये ही योजना राबविण्याची मागणी होत आहे.
superb job sir ji 👌 👌
ReplyDeleteएकदम बरोबर आहे
ReplyDelete