प्रिय दालचिनी ताईस,
पत्र लिहिण्यास कारण की, मागच्या आठवड्यात बदाम काका झाडावरून पडले होते, आता
त्यांची तब्येत बरी आहे. आनंदाची बातमी अशी श्री.लवंग यांची मुलगी चि.सौ.कां.मिरी हिचे लग्न कु.जिरे ह्याच्याशी ठरले आहे.
स्थळ उत्तम आहे. तिखट मावशी व गोड मसाले काका यांनी
मध्यस्थी केली म्हणून हे लग्न जमले आहे. काजू व पिस्ता हे बि.
कॉम झाल्यामुळे त्यांचा भाव खूप वाढला आहे. मोहरीला
अजून शाळेत घातले नाहीं. कडीपत्ता पहिलीत आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे साखर व चहा पावडर यांच्या लग्नाला विरोध झाल्यामुळे त्या
दोघांनी सकाळी उकळत्या पाण्यात जीव दिला. घटनास्थळी कपबशी उपस्थित
होती. बटाटेमामानी विळीवर खुपसून जीव दिल्यामुळे कांदेमामी स्वतः
रडत होत्या व दुसर्यानाही रडवत होत्या. बाकी सगळे ठीक आहे. लसूण, कोथिंबीर,
व खसखस ह्यांना गोड गोड पापा
तुझाच, जायफळ दादा
पत्ता : खलबत्ता-बेपत्ता,
मुक्काम- अलीकडे, तालुका-
पलीकडे, जिल्हा- सगळीकडे.
*****
आयुष्य छान आहे थोडे लहान आहे ! रडतोस काय वेड्या? लढण्यात शान आहे.! काट्यातही फुलांची झुलती कमान आहे ! उचलून घे हवे ते,
दुनिया दुकान आहे ! जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान
आहे. ‘सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी
रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं
लागतं‘.
*****
गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या सर्वांनी 30 पर्यंत पाढे पाठ करून यायचे.... पुढच्या दिवशी...
बाई : ऊठ मक्या... सांग सत्तावीस
नव्व (27 x 9) किती?
मक्या जरावेळ विचार करतो, मक्या : लई सोपं हाय बाई... 270 वजा 27...

No comments:
Post a Comment