शिक्षक
भारतीचा इशारा
जत.(प्रतिनिधी)-
जिल्ह्यातील
प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत शिक्षक भारतीच्या
शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी निशादेवी वाघम ोडे यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. शिक्षकांच्या अंशदान
कपातीच्या रक्कमा त्यांच्या फंडात वर्ग करण्याची कार्यवाही तात्काळ करावी अन्यथा दिवाळीनंतर
शिक्षक भारतीच्यावतीने जिल्हा परिषदसमोर आंदोलन करू असा इशारा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष
महेश शरनाथे यांनी दिला.
शिक्षकांच्या अशंदान कपाती सदर शिक्षकांच्या फंडात
वर्ग करण्यासाठी शिक्षक भारतीने यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला आहे. त्याबाबतीत शासनानेही 20 डिसेंबर 2017 रोजी शासन निर्णय पारित केला. सदर प्रश्नाचा शिक्षक भारती गेली वर्षभर जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा करत आहे.
हा प्रश्न आता जि.प.
पातळीवर आहे तो तात्काळ न सुटल्यास शिक्षक भारती दिवाळीनंतर या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर लोकशाहीच्या सनदशिर मार्गाने लाक्षणिक
उपोषण करेल असा इशारा देण्यात आला.
दिवाळीपूर्वी गडपेचा प्रश्न, बारा वर्षे व 24 वर्षे पुर्ण
झालेल्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी, परिविक्षाधिन प्रस्ताव
दिलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत, स्थायी प्रस्तावासाठी
नाँन कि‘मीलिअर ,रजेचा तपशील या कागदपत्राची
आवश्यकता नाही.या अटी वगळण्यात याव्यात, वरिष्ठ मु‘याध्यापक,विषय शिक्षक
,विस्तार अधिकारी पदोन्नती करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या.
शिक्षक भारतीने यापूर्वी केलेल्या काही मागण्या पूर्ण झाल्याबद्दल शिक्षणाधिकारी
सौ. वाघमोडे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे ,फैसल
पटेल, सुधाकर वसगडे, कृष्णा पोळ,
दिगंबर सावंत, संजय कवठेकर, जमीर मणेर, रतन कुंभार यांच्यासह शिक्षक भारतीचे पदाधिकारी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment