जत,(प्रतिनिधी)-
टि.एस. अहवालाचे कारण पुढे करून राज्य शासनाने धनगर आरक्षणाचा प्रश्न मागील चार वर्षे प्रलंबित ठेवला आहे. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर धनगर समाजातील तरुणांच्या भावनांचा उद्रेक होईल याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच रहाणार आहे. असा ईशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी जत येथे पत्रकार बैठकीत बोलताना दिला .
आरेवाडी ता.कवठेमहांकाळ येथील दसरा मेळाव्यास धनगर समाजातील सर्व सामाजिक संघटना , सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत. असे सांगून प्रकाश शेंडगे पुढे म्हणाले की, येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी तिन महिन्यात शासनाला आरक्षण देण्यासाठी भाग पाडू . काग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला धनगर समाजाने सत्तेवरून खाली खेचले होते आणि भाजपा - शिवसेना युतीला सत्तेवर बसवले होते . आता सत्ता उलथवून टाकण्याची ताकद धनगर समाजातील तरुणात निर्माण झाली आहे. त्यामुळे जसे सत्तेत बसवले तसे खाली खेचणार आहे असा ईशारा प्रकाश शेंडगे यानी यावेळी बोलताना दिला. टि.एस . चा अहवाल शासनाला सादर झाला आहे. तरीही सहजपणे आरक्षण मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही दबाव तंत्राचा आवलंब करणार आहे. असा ईशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. माजी जि.प.सदस्य कुंडलीक दुधाळ - पाटील , अशोक बन्नेनवार , अँड. एम. के.पुजारी , मुकूंद बंडगर , बंटी दुधाळ , शंकर वगरे आदीजण यावेळी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment