जत, (प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील मल्लाळ येथील शेतकरी गोरख हणमंत काळे (वय 39) यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजता घडली आहे.
जतपासून दक्षिण भागात सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मल्लाळ गावात राहत असलेल्या द्राक्ष बागेसाठी विकास सोसायटी चे कर्ज काढले होते .त्याच बरोबर काही मित्रांकडून हात उसनेही घेतले होते. असे एकूण सुमारे चार लाखांचे कर्ज त्यांच्या अंगावर होते.
सध्या पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे . यामुळे द्राक्ष बाग करता आली नाही.शेतीचे मोठे नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड कशी करायची, असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता. याच विवंचनेत त्यांनी काल दुपारी द्राक्ष बागेवर फवारण्याचे विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.याबाबत जत पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
No comments:
Post a Comment