जत,(प्रतिनिधी)-
डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, एन एस यु आय, व राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने प्राध्यापकांच्या बेमुदत आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याच्या निषेधार्थ आज तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
25 सप्टेंबर 2018 पासून प्राध्यापकांनी त्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. त्यातच विद्यापीठाच्या परीक्षा अंतर्गत मूल्यांकनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्राचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात शासन दरबारी त्वरित तोडगा निघावा यासाठी विविध विद्यार्थी संघटनेच्यावतीने आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात अाला. राज्य शासनाने आपल्या पातळीवर या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ तोडगा काढावा व होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशा प्रकारचे निवेदन तहसीलदार आणि महाविद्यालय व्यवस्थापनास देण्यात आले.
या झालेल्या आंदोलनात महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक युनियन सांगली सीटू (CITU) संलग्न या संघटनेने प्राध्यापक संपास व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या शासनाचा जाहीर निषेध कॉम्रेड हणमंत कोळी यांनी केला.
यावेळी DYFI चे डॉ. सुदर्शन घेरडे म्हणाले, देशात सगळ्याच सर्वसामान्य आणि गरिबांचं नुकसानीच वातावरण आहे आणि त्यातच ही शैक्षणिक नुकसान आज राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर ओढावलेलं आहे. यावेळी हेमंत चौगुले, गणेश चव्हाण यांचीही भाषणे झाली .
दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांवर झालेला लाठीचार्जचाही यावेळी जाहीर निषेध केला.
या मौर्चाला 'डी.वाय. एफ.फाय'चे डॉ. सुदर्शन घेरडे, 'एसएफआय'चे अहमद नदाफ,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे पवन कोळी, सौरभ राजेशिर्के, 'एनएसयुआय' चे योगेश बामणे, पवन पाथरूट, प्रियांका फडणवीस, मनीषा सावंत, अविनाश सनदी व ओंकार केंगार, तसेच राजे रामराव महाविद्यालयचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आभारी आहे
ReplyDelete