जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या
संख गावात विविध योजनांमधून महादेव, बिरोबा आणि लक्ष्मी
मंदिराचे काम सुरू आहे. तसेच अन्य मंदिरांमध्ये विद्युतीकरण सुरू
आहे.
सहा महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत
सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आली आहे. सौ.मंगल पाटील या पहिल्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.
त्यांच्या माध्यमातून गावात विविध विकास कामांना प्रारंभ झाला आहे.
गावांमध्ये आमदार विलासराव जगताप यांच्या विकासनिधीतून सात लाख रुपयाचे
महादेव मंदिर व सात लाख रुपयांची बिरोबा मंदिराचे काम सुरू आहे. खासदार विकास निधीतून चर्मकार समाजासाठी लक्ष्मी मंदिर जवळील समाज मंदिर सुरू
आहे. नागरी सुविधामधून गावातील कोळी गल्ली, मशिदीसमोर, लायव्वा मंदिर, पंचमुखी
मारुती मंदिर या ठिकाणी पाच लाख रुपये खर्च करून हायमास्ट विद्युतीकरण करण्यात आले
आहे. जनसुविधा योजनेतून हिंदू स्मशानभूमीसाठी कंपाऊंड करून झाडे
लावून त्या ठिकाणी सुशोभीकरण केले आहे. चौदाव्या वित्त आयोगामधून
शिवाजी चौक येथे नवीन मुतारी बांधकाम स्त्रिया व पुरुष यांच्यासाठी केले असून यासाठी
एक लाख पंचवीस हजार रुपये खर्च केले आहेत. संख व भिवर्गी तलावातून
गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन करून कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यात
आली आहे.
याशिवाय गावात प्रथमच घंटागाडीची देखील सोय करण्यात
आली आहे.
सरपंच मंगल पाटील यांनी ग्रामसेवक कुशाबा नरळे यांना बरोबर घेऊन गावामध्ये
अनेक विकासकामे सुरू केले आहेत. संख गाव हे विकासाचे
‘आयडॉल’ करण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन
मंगल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. संख हे गेल्या अनेक
वर्षांपासून विकासापासून वंचित असलेले गाव आहे. येत्या चार वर्षांत
या गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करू. विकासाचा आराखडा
तयार केला असून स्वच्छ व सुंदर संख करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सौ.पाटील म्हणाल्या. जत शहरानंतर प्रशासनाने संख गावाला
अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू केले असून यामुळे परिसरातील चाळीस ते पन्नास गावे जोडली
आहेत. गावात लोकांची वर्दळ वाढली आहे. शासनानेही
या ग्रामपंचायतीला सर्वाधिक निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी
केली.
No comments:
Post a Comment