जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील आसंगी (जत) येथील जिल्हा परिषद प्राथमिक
शाळेत रूबेला व गोवर याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थी, पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
नोव्हेंबर महिन्यात 14 नोव्हेंबरपासून सांगली जिल्ह्यात रुबेला आणि गोवर लसीकरण मोहिम राबवण्यात येत
आहे. यासाठी जनजागृती करण्यासाठी व शंभर टक्के लसीकरण मोहिम पूर्ण
करण्यासाठी शाळांमध्ये पालक मेळांचे आयोजन केले जात यावेळी सुभाष हुवाळे म्हणाले,
गोवर या आजाराचे निर्मूलन करण्यासाठी व रूबेला या रोगावरती नियंत्रण
लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या आजारामुळे कोणते तोटे
होतात, याबद्दलची माहिती दिली. यावेळी शाळा
व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ कोळी व मुख्याध्यापक एस. के.
कबाडगे यांनी आपल्या शाळेत या दोन्ही लसीकरण शंभर टक्के केले जाईल,
याबाबतचे आश्वासन पालकांना दिले.
शाळेतील समस्या आणि गुणवत्ता याबाबत पालक आणि शिक्षक
यांच्यात विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी भीमाण्णा
मणंकलगी, शशिकांत कुलकर्णी, स्वाती जाधव,
नागाप्पा होर्तीकर उपस्थित होते.आभार मल्लिकार्जुन
कोळी यांनी मानले.
Best job
ReplyDelete