जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील संख येथील अप्पर तहसीलदार नागेश गायकवाड
यांच्यावर पूर्व भागातील अनेक नागरिकांनी व पदाधिकार्यांनी वाळूसाठी हप्ते घेत असल्याच्या तक्रारी आमसभेत केल्यानंतर त्यांची बदली
झाली असून त्यांच्या जागी नवे अप्पर तहसीलदार म्हणून अर्चना पाटील यांची नियुक्ती झाली
आहे.
संख येथे
सव्वा वर्षापूर्वी अप्पर तहसीलदार कार्यालयाची स्थापना झाली या कार्यालयाचे प्रमुख
म्हणून कवठेमहांकाळ येथील नायब तहसिलदारपदी नागेश गायकवाड यांच्याकडे अप्पर तहसीलदार
म्हणून कार्यभार दिला, मात्र गेल्या सहा वर्षात त्यांचा कार्यभार
हा सातत्याने वादग्रस्त ठरला आहे. नुकत्याच झालेल्या आमसभेत त्यांच्यावर
अनेक गंभीर आरोप झाले. महिन्याकाठी ते हप्ते गोळा करतात अशा पद्धतीचे
आरोप करून अनेक पदाधिकार्यांनी प्रांतांना पुरावे देण्याचे जाहीर
केले. उमदी येथे दोन दिवस अप्पर तहसिल संख येथील अप्पर तहसीलदार
यांची बदली अर्चना पाटील यांची नव्याने नियुक्ती मंजूर असतानाही ते गेल्या दहा महिन्यात
कधी तिकडे गेले नाहीत त्यामुळे त्यांची बदली करावी, अशी मागणी
झाल्यानंतर अखेर त्यांची बदली कवठेमहांकाळ येथे केल्याचे समजते. त्यांच्या जागी अप्पर तहसीलदार म्हणून अर्चना पाटील यांची दोनच दिवसांपूर्वी
नियुक्ती झाली असून वाळू तस्करीला लगाम न घातल्याने संख अप्पर तहसीलदार यांना दणका
बसल्याचे चर्चिले जात आहे.
No comments:
Post a Comment