पुणे : महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च
2019 मध्ये घेतल्या जाणार्या दहावी व बारावीच्या
लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले
आहे. दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च ते
22 मार्च 2019 या कालावधीमध्ये होईल; तर बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते
20 मार्च 2019 या कालावधीमध्ये होणार आहे,
अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील दहावी व बारावीचे
विद्यार्थी, शिक्षक यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जावे.
विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा, यादृष्टीने
संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आल्याची माहिती सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. मंडळाकडून संकेतस्थळावर जाहीर
करण्यात आलेले वेळापत्रक हे संभाव्य आहे, परीक्षेपूर्वी शाळा
व कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळांकडून जे छापील वेळापत्रक पाठविले जाईल, ते अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी छापील वेळापत्रकानुसार
परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेणे आवश्यक आहे. इतर क्लासेस
यांनी छपाई केलेले, सोशल माध्यमावरून प्रसारित झालेले वेळापत्रक
विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये, असे आवाहन भोसले यांनी केले
आहे.
No comments:
Post a Comment