जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सम्ख येथे शनिवारी झालेल्या
विशेष लोकन्यायालयात भूमी संपादनाच्या 150 केसेसपैकी 62 केसेस तडजोडी करून सोडवण्यात आल्या.
या केसेस भिवर्गी, अंकलगी, बेळोंडगी, उटगी आणि करजगी या परिसरातल्या होत्या.
लघुपाटबंधारे तलावांमधील भूसंपादनाबाबत वाढीव मोबदला मिळण्याबाबतच्या
या केसेस होत्या.
सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे
सदस्य सचिव व्ही.एस.माने, सेवानिवृत्त न्यायाधीश श्री. पिसे आणि श्री. उपाध्ये उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर आणि वसुंधरा बारवे
उपस्थित होते. पाटबंधारे विभागाच्यावतीने सचिन पवार तसेच उपकार्यकारी
अभियंता श्री. अजेटराव उपस्थित होते. संपादन
मंडळाचे प्रतापराव देशमुख यांनी वकील म्हणून काम पाहिले. शेतकर्यांच्यावतीने अॅड. सुधीर खाडे
आणि बी.एस. चव्हाण यांनी कामकाज पाहिले.
संखमधील ग्रामसचिवालयात हे लोकन्यायालय भरवण्यात आले होते.

No comments:
Post a Comment