Tuesday, October 2, 2018

युवक कॉंग्रेसच्यावतीने 5 ऑक्टोबर रोजी जतला मोर्चा

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील भीषण पाणी टंचाई ,पाऊस न झाल्याने वाया गेलेला खरीप हंगामाची नुकसान भरपाई मिळावी आणि पेट्रोल-डिझेलचे वाढत चाललेले  दर या व अन्य मागण्यांसाठी जत तालुका युवक काँग्रेसच्यावतीने  5 ऑक्टोबर रोजी जत तहसीलदार कार्यलयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे विकास माने आणि योगेश बामणे  यांनी दिली.
आज पर्यंत या तालुक्याने अनेक प्रश्नासाठी संघर्ष केला आहे आणि संघर्षाशिवाय काही मिळाले नाही हा इतिहास या तालुक्याला काय जुना नाही. पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट असताना हे सरकार झोपेचं सोंग घेत आहे.  पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे.मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्यात यावा.खरिप पिकांचा पंचनामा करून त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जाटील झाला असून चारा छावणी सुरू करावेत, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी सरकारला जागे करावे लागणार आहे आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी हा मोर्चा मोठ्या प्रमाणत होणे गरजेचे आहे, शेतकरी बांधवांनी, जनतेने वेळ काढून या झोपलेल्या सरकारला भानावर आणण्यासाठी  शुक्रवार दि 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मार्केट यार्ड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. हा मोर्चा  जत मार्केट यार्ड येथून  सुरुवात होणार असून तहसील कार्यालय येथे सभा होऊन सांगता होणार आहे.

No comments:

Post a Comment