मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत 80 टक्के व अधिक अपंगत्व असलेल्या निराधार व्यक्तींना
आता दर महिन्याला 1 हजार रूपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात
आला असून दिव्यांग लाभार्थ्यासाठी उत्पन्न मर्यादाही 21 हजारावरून
50 हजार करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल
1 लाख 35 हजार दिव्यांगांना याचा लाभ मिळणार आहे.
उत्पन्न मर्यादा वाढवल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढेल असे मंत्री
राजकुमार बडोले यांनी सांगितले.
अल्पभूधारक
शेतकर्यांचे खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत लाभ न मिळालेल्या अल्प भूधारक
शेतकर्यांचे खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय कर्जमाफीसंबंधी
नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने बुधवारी घेतला. आत्तापर्यंत केवळ
22 लाख 13 हजार शेतकर्यांना
कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. शेतकरी कर्जमाफीचा आढावा
घेण्यासाठीसंदर्भातील बैठक महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील
दालनात झाली.
सात हजार सौर कृषी पंप वाटप करण्याचा निर्णय झाला
आहे.
विजेची वाढती मागणी, वाढते दर लक्षात व नैसर्गिक
स्रोतांपासून वीज निर्मिती करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन राज्यात पहिल्या टप्प्यात
अटल सौर कृषी पंप योजने अंतर्गत 7 हजार सौर कृषी पंप वाटप करण्यास
राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यासाठी 240 कोटी रुपये खर्च येणार आहे, असे ऊर्जामंत्री बावनकुळे
यांनी सांगितले.(kesari)
No comments:
Post a Comment