Wednesday, December 19, 2018

विज्ञान प्रदर्शनात ऋचा जोशी आणि समर्थ माने यांची उपकरणे अव्वल


जत,(प्रतिनिधी)-
वळसंग (ता. जत) येथील श्री हनुमान इंग्लिश स्कूल येथे 44 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले. याला शाळांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनात 6 वी ते 8 वी या उच्च प्राथमिक गटात शेगाव हायस्कूलच्या कु. ऋचा नितीन जोशी तर 9 वी ते 12 वी या माध्यमिक-उच्च माध्यमिक गटात डफळापूर हायस्कूलच्या समर्थ संजय माने याच्या विज्ञान उपकरणास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

    6 वी ते 8 वी इयत्ता गटात द्वितीय क्रमांक किरण विजय नाईक (रामराव विद्यामंदिर,जत) तर तृतीय क्रमांक संदीप हिंचगेरी (जाडरबोबलाद हायस्कूल)याच्या उपकरणास मिळाला. उच्च माध्यमिक गटात श्रीशैल राजू तेली (लायन्स क्लब,जत),तृतीय क्रमांक कु. स्नेहा एकनाथ कोळी (संख हायस्कूल) यांच्या उपकरणास मिळाला. यावेळी प्रश्न मंजुषा स्पर्धाही घेण्यात आल्या. यात जालिहाळ बुद्रुक येथील येरळा शाळा, लमाणतांडा येथील माध्यमिक आश्रमशाळा आणि कुंभारी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या संघाला अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले.
 प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत व्ही.एम. मेश्राम (जिरग्याळ), श्रीकांत सोनार (वळसंग), शहाजी साळुंखे (निगडी खुर्द) यांच्या साहित्यास अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. माध्यमिक गटात रणजीत इंगवले (शेगाव हायस्कूल), अशोक पाटील (बाज) यांच्या साहित्यास अनुक्रमे पहिले दोन क्रमांक मिळाले.
यावेळी प्रयोगशाळा परिचर असलेल्या तानाजी ऐवळे (बाज), पांडुरंग चौगुले (कुणीकोण्प्प्र) आणि रेवणसिद्ध पाटील (सनमडी) यांचा विशेष गौरव करण्यात आला. पारितोषिक वितरण जि.. शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रविपाटील,ॅड्. प्रभाकर जाधव, गटशिक्षणाधिकारी बी.एन.जगधने यांच्याहस्ते झाले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र माने यांनी केले तर आभार डी.एन. कसबे यांनी मानले.



No comments:

Post a Comment