|
प्रमोद महाजन सांगलीच्या ढवळी गावचे
जत,(प्रतिनिधी)- भारतात आतापर्यंत
एक लाख पाच हजार लोक ब्रेनडेडने मृत्युमुखी पडले असून त्यापैकी केवळ 817 लोकांचेच अवयवदान करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत
जास्त अवयवदानाचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे यासाठी शासन,प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मात्र एक 67 वर्षांचा तरुण याच्या जनजागृतीसाठी धडपडताना
दिसतोय.
हा तरुण सांगली
जिल्ह्यातील ढवळी गावचा आहे. त्याचे नाव आहे, प्रमोद लक्ष्मण महाजन! सध्या ते सोलापूर जिल्ह्यात
जनजागृतीचे काम करीत आहेत. असल्याचे मत प्रमोद लक्ष्मण महाजन
यांनी व्यक्त केले. या आजोबांनी 18 वर्षापूर्वी
एका सैनिकाला सामाजिक बांधिलकीतून आपली एक किडनी दिली होती. आज ते अवयवदान जनजागृतीसाठी मोटारसायकलवरून
घराबाहेर पडले आहेत.
पुण्यातील रिबर्थ फाउंंडेशनच्या सहकार्याने दहा हजार किलोमीटरचा प्रवास
100 दिवसात ते मोटारसायकलीद्वारे एकटेच पूर्ण करणार आहेत. गेल्या 21 ऑक्टोबर 2018 रोजी
पुणे येथील शनिवारवाड्यापासून आपल्या या मोहिमेस त्यांनी सुरुवात केली आहे.
या मोहिमेचा समारोप ते 25 जानेवारी
2019 रोजी पुणे येथेच करणार आहेत. आतापर्यंत
त्यांनी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश,
हरियाणा, दिल्ली, पंजाब,
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड
या राज्यांचा प्रवास करून ते महाराष्ट्रात आले आहेत. आता ते
सोलापुरातून पुढे तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा असा प्रवास
करून पुणे येथे आपल्या मोहिमेचा समारोप करणार आहेत.
प्रवासादरम्यानते विविध शाळा-महाविद्यालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदानासंदर्भात जनजागृती करीत
आहेत. तसेच अवयवदान जनजागृतीचे काम करणार्या सामाजिक संस्थांचाही ते गाठीभेटी घेत आहेत. प्रवासादरम्यान
त्यांच्या राहण्या-खाण्याची व मुक्कामाची व्यवस्था ऑल इंडिया
बायकर्स ग्रुप आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
रोज किमान दोनशे किलोमीटरचा प्रवास करीत असून जिल्ह्याच्या ठिकाणी
2 दिवस मुक्काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
|
No comments:
Post a Comment