जत,(प्रतिनिधी)-
जतचा विकास न व्हायला जसा पाणी प्रश्न, औद्योगिक
प्रश्नांचा जसा अभाव कारणीभूत आहे, तसाच रेल्वे मार्ग
नसल्यानेदेखील विकासाचा खोळंबा झाला आहे. जत तालुका दुष्काळी असला तरी पाण्याची
काटकसर करत शेतकरी द्राक्षे, डाळींब, बोर
या फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड करीत आहेत. ड्रॅगन फूड, चिकू,
पेरू, पॉपकॉर्न मका अशी फळे, पिके घेतली जात आहे, मात्र या फळांना बाजारपेठ
चेन्नई, बंगळुरू, मुंबई, पुणे या भागात उपलब्ध आहे.
इथं पर्यंत पोहचायला शेतकऱ्याला कठीण जात आहे.
वाहतूक व्यवस्थित असेल तर मालाला चांगला दर मिळणार आहे. यामुळे आणखी शेतकरी या
क्षेत्राकडे वळणार आहेत. सध्या तालुक्यात पावसाअभावी रब्बी आणि खरीप हंगाम वाया
गेला आहे. लोकांना रोजगार उपलब्ध नाही. जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर
होत आहे. ऊस तोडीसाठी, विटभट्टी,दगड
खाण यासाठी लोक बाहेर जात आहेत. शिकलेले लोक पुणे, मुंबई
इकडे जात आहेत. त्यामुळं लोकांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे लोक स्थिर
नाहीत. तालुक्यात औद्योगिक विकास झाला नाही. कंपन्यांना या भागात उद्योग उभे
करण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. यासाठी रेल्वे मार्ग आवश्यक आहे.
आता जो मार्ग जत तालुक्यातून गेला आहे, तो
मार्ग जत पासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. जतरोड स्टेशन ला
जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे या स्टेशनचा जत तालुक्याला काहीच उपयोग
नाही. त्यामुळे मिरज-जत-विजापूर हा मार्ग होण्याची गरज आहे.
असा मार्ग झाला तर आणखी फायदा होणार आहे.
मिरज-जत-विजापूर-शाहबाद वाडी जंक्शन रेल्वे मार्ग हा याच रेल्वे मार्गतील कवठेमंहकाळ रेल्वे स्टेशन येथे २०० एकरमध्ये होत असलेल्या ड्रायपोर्टमुळे
पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सातारा नाशिकरोड हि जिल्हाची आणि आक्कलकोट रोड ,सांवतवाडी रोड,इंन्डी रोड हि तालुक्याची ठीकाणे त्याच्या शहरातून जत रोड प्रमाणे दुरवरच आहेत पण येथे जाण्याची व्यवस्था उत्तम आहे .तशीच जत रोड स्टेशनला जत शहरातून होणे गरजेचे आहे म्हणून जत-सांगोला बस ह्या व्हाया जत रोड मार्गाने सोडव्यात
ReplyDelete