जत,(प्रतिनिधी)-
गेल्या तीन महिन्यांपासून जत तालुक्याला टँकरने पाणी
पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली जात
होती, मात्र प्रशासन जागे होत नव्हते. शेवटी अनेक राजकीय
पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने अखेर आज प्रशासनाने तालुक्यातल्या पाच गावांना
पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. तालुक्यातील व्हसपेठ
(वाडीवस्ती), सोन्याळ (वाडीवस्ती),लमाणतांडा
(द.ब.), दरिबडची (दोन गावासाठी एक टँकर), कोंतेबोबलाद या पाच गावांना 2 डिंसेबर पासून टँकर
मंजूर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, तीव्र दुष्काळांच्या
पाश्वभूमीवर प्रशासनाकडून गतीने उपाययोजना सुरू आहेत.यापुर्वी जिल्हाधिकारी
यांच्याकडे असणारे टँकर मंजूरीचे अधिकार 29 नोव्हेंबरच्या
शासन निर्णयानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यांच्याकडे आलेल्या
प्रस्तावातून सध्या पाच गावांना तातडीने टँकर सुरू करण्यात आले आहेत. यापुढील
मागणी असणाऱ्या गावांच्या टँकर प्रस्तावावर कारवाई सुरू आहे. तेथेही लवकरच टँकर
सुरू करण्यात येतील, त्याशिवाय अन्य दुष्काळी उपाययोजना शासन
निर्णयानुसार करण्यात येतील,असे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment