जत,(प्रतिनिधी)-
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी डिझिटल
तंत्रज्ञानाची कास धरावी, यासाठी प्रयत्नशील असलेले
बसर्गी गावचे उपसरपंच किशोर बामणे यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून खासगी प्राथमिक
शाळेस संगणक आणि प्राथमिकच्या सर्व वर्गाें अभ्यासक्रम सॉफ्टवेअर दिले. यामुळे स्वयंअध्ययनावर भर देतील, असा विश्वास श्री. बामणे यांनी व्यक्त केला.
डिझिटल वर्गखोलीचे उदघाटन जत पंचायत
समितीच्या सभापती सुशिला तावंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी बसर्गीच्या सरपंच इंदुमती पाटील, विकास सोसायटीचे
अध्यक्ष शिवाप्पा तावंशी, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पिरगोंडा बिरादार,
संस्थेचे सचिव माळी, पोलिसपाटील बाबा पाटील,
बसाप्पा कलमडी, तुळशीराम बामणे,मुख्याध्यापक वाघ,माजी मुख्याध्यापक नाथा बामणे,
हराले, प्रवीण बामणे, दत्ता
बामणे, महेश बामणे, गणपती जनोडे,
प्रशांत बामणे, छोटू बामणे यांच्यासह शिक्षक,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभापती सौ. तावंशी म्हणाल्या, किशोर बामणे
यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन शाळा डिझिटल होण्याला हातभार लावला आहे.
त्यामुळे अन्य लोकप्रतिनिधी, गावातल्या प्रतिष्ठित
लोकांनी आणि शिक्षकांनी डिझिटल तंत्रज्ञान शाळेत यावे, यासाठी
प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

No comments:
Post a Comment