जनावरांचा खर्च परवडेना..!
जत,(प्रतिनिधी)-
चार वर्षांपासून दुष्काळात होरपळत असलेल्या जत तालुकावासीयांच्या मानगुटीवर
यंदाही दुष्काळाचे संकट कायम आहे. सध्याच्या दुष्काळी
परिस्थितीत गुरंढोरं सांभाळणे अशक्य होणार असल्याच्या धास्तीने पशुधनाची बेभाव विक्री
होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.मात्र या जनावरांची फारच कमी
दराने विक्री होताना दिसत आहे.
दुष्काळी भागात उपाययोजना राबविण्याच्या
सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. शेतकर्यांची मुक्याजीवांविषयीची घालमेल लक्षात घेता शासन, प्रशासनाने
यापुढे जाऊन उपाययोजना राबविण्याची गरज असल्याची अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. निसर्गावर अवलंबून असलेला
बिनभरवशाच्या शेतीने यंदाही शेतकर्यांना दगा दिला. त्यातच गावोगावच्या विहिरी,कुपनलिकांच्या पाण्याच्या
पातळीने तळ गाठल्याने माणसांनाच पाणी मिळेना तिथे जनावरांना कुठून पाणी आणायचे,
असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासन पाण्याचा टँकर सुरू करण्याबाबत
कंजुषी करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने
तातडीने माणसांनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
न सोडवळ्यास जनावरांची अशीच विक्री होत राहणार आहे. सततच्या दुष्काळी
परिस्थितीत शेतकर्यांना पशुधनानेच तारले आहे. आता त्यावरच घाला आला असल्याने शेतकरी मोठा चिंताग्रस्त झाला आहे.
सध्या दुष्काळी
परिस्थितीमुळे जनावरांचा सांभाळ करणे शक्य होत नाही, पाण्याबरोबर
चार्याचाही प्रश्न गंभीर होत आहे.
जनावरांचा खर्च परवडत नसल्याने गुरांची विक्री केल्याशिवाय पर्याय नाही.
गोवंश हत्याबंदी कायद्याने भाकड, निरुपयोगी जनावरे
शेतकर्यांना सांभाळावी लागत आहेत. यासाठी
आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. काळात मुक्याजीवांची होणारी
तडफड डोळ्यादेखत नको म्हणून आजमितीला मिळेल, त्या दराने पशुधन
विक्री केल्या जात असल्याने जनावरांच्या किंमतीमध्ये कमालीची घट झाली आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे धास्तावलेल्या शेतकर्यांच्यापाठीशी
सरकारने उभे राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment