23/10 च्या जी आर बद्दल सकारात्मक
जत,(प्रतिनिधी)-
'शिक्षक भारती'चे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण आयुक्त यांची मुंबई येथे भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा केली असल्याची माहिती जत तालुका शिक्षक भारती अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी दिली.
प्राथमिक व माध्यमिक तसेच सर्व सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती पासूनची सेवा ग्राह्य धरण्यात यावी, 23/10 च्या वरिष्ठ व निवड श्रेणी जी आर मध्ये दुरुस्ती करून विनाअट वेतन श्रेणी देण्यात यावी, 27 /2 च्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत सुलभता आणावी, 2 जानेवारी 2005 ते 31 डिसेंबर2005 या कालावधीत नियमित वेतनावर आलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनातील वेतन तफावत दूर कराव्यात, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी, राज्यातील सर्व शाळांना मोफत वीज देण्यात यावी, मुख्याध्यापकाना केंद्रीय विद्यालयाप्रमाणे स्वतंत्र वेतन श्रेणी देण्यात यावी, ऑनलाइन कामाचे आऊटसोर्सिंग करावे, 'बीएलओ'चे काम शिक्षकांना देऊ नये तसेच कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत इत्यादी मागण्यासाठी आमदार कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत शिक्षण आयुक्तांसोबत शिक्षक भारतीच्या बैठकींमध्ये शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी 'प्राथमिक शिक्षक भारती'चे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, माध्यमिकचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे,जालिंदर सरोदे,सुभाष मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment