जत,(प्रतिनिधी)-
प्रतिनिधी महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे
आराध्य दैवत असलेल्या जत येथील श्री यल्लम्मादेवीच्या यात्रेच्या दुसर्या दिवशी ‘श्रींचा नैवेद्याचा दिवस होता. लाखो भाविकांनी भक्तिभावाने पहाटेपासून संध्याकाळपर्यंत देवीला नैवेद्य अर्पण
केला. मंगळवारी यात्रा परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
जत येथील
यल्लमादेवीच्या यात्रा परिसरात दुसर्या दिवशी साडेचारशे ते पाचशेच्या
आसपास खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारले आहेत. यामध्ये भेळपुरी,
पाणीपुरी, दाबेली गाडे, चायनीज,
आईस्क्रीमच्या गाडेवाल्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दुसर्या दिवशी दोन लाखाच्या आसपास भाविकांनी हजेरी लावली
होती. यात्रास्थळावरती श्री यल्लामा देवी प्रतिष्ठानच्यावतीने
पिण्याच्या पाण्याची खास व्यवस्था केली होती. यात्रास्थळावर पोलीस
ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता.
सांगली मार्केट कमिटीच्या वतीने भरविण्यात आलेल्या
जनावरे प्रदर्शन व शेतीमाल प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी अनेक भाविकांनी पाहणी केली, तर यात्रा परिसरात खिलार जनावरे आले आहेत. दोन लाख ते
पाच लाखांपर्यंतचे खिलार खोंडाची आज मोठ्या प्रमाणात विक्री झाली. येत्या चार दिवसांत मोठ्या प्रमाणात विक्री होईल, अशी
माहिती मार्केट कमिटीचे सहसचिव सोमनिंग चौधरी यांनी सांगितले. श्री यल्लमादेवीच्या यात्रेत गोंधळेवाडी (ता.
जत) येथील तुकाराम महाराज यांनी पिण्याच्या पाण्याचे
सहा टँकर व अकरा पाण्याच्या टाक्या मोफत यात्रा होईपर्यंत देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment