Tuesday, January 1, 2019

जत यात्रेत तुकाराम महाराजांकडून पाण्याचा टँकर


जत,(प्रतिनिधी)-
 येथील श्री यल्लम्मादेवीच्या यात्रेकरूंची व जनावरांची सोय व्हावी, यासाठी गोंधळेवाडी (ता. जत) येथील तुकाराम महाराज यांनी स्वखर्चातून पाच पाण्याचे टँकर व 6 सिंटेक्स टाक्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी गोंधळेवाडी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज, मार्केट कमिटीचे सोमनिंग चौधरी, महेश चव्हाण व शेतकरी उपस्थित होते. तुकाराम महाराज म्हणाले, जत तालुका हा गेल्या वर्षभरापासून दुष्काळाने हैराण झाला असून यावर्षी यात्रेतील जनावरांना व यात्रेकरूंनाही दुष्काळाची मोठी झळ बसत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊनसंकल्प दुष्काळाचाया मोहिमेद्वारे शहरातील यात्रेकरूंची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी खासकरून पाच पाण्याचे टँकर व सहाशे यात्रेकरूंची तहान भागविण्याची एक सामाजिक बांधिलकी जपली असून यापुढेही तालुक्यातील गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल त्या ठिकाणी हजर राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली

No comments:

Post a Comment