सांगली,(प्रतिनिधी)-
पेट्रोलियम
मंत्रालयाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ आता सर्वच घटकातील गरिबांना मिळणार
आहे. योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते
1 जून 2016 बालिया (उत्तर
प्रदेश) येथे झाले होते. या योजनेसाठी
12 हजार 800 कोटी रुपयेएवढा फ़ंड राखीव ठेवून
5 कोटी घरांच्या महिलांना मार्च 2019 पर्यंत आणि
3 कोटी एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी राहुल पाटील
यांनी दिली.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात 91 हजार गॅस कनेक्शन देण्यात आल्याचेही ते म्हणाले. ऑईल
कंपनीने 5 कोट्यवधीचे उद्दिष्ट ऑगस्ट 2018 म्हणजे निर्धारित वेळेच्या 8 महिन्याआधी पूर्ण केले.
गरीब परिवाराच्या स्वयंपाक घरातून धूर बाहेर काढून त्यांना स्वच्छ इंधन
उपलब्ध करून देण्यामागे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही अग्रेसर चळवळ ठरली आहे.
मागच्या वर्षी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये नवीन 7 कॅटेगरी समाविष्ट करण्यात आल्या. प्रधानमंत्री आवास योजनाचे
लाभार्थी, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी, फॉरेस्ट ड्वेलर, मोस्ट बॅकवर्ड क्लास, टी आणि एक्स- टी गार्डन ट्राईबस, इसलँडमध्ये राहणारे परिवार यांचा समावेश आहे.
देशात सगळ्यांना स्वच्छ इंधन प्राप्त व्हावे, यासाठी कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेर ज्याचे मुख्य प्रधानमंत्री असतात,
त्यांच्या नुकत्याच झालेल्या निर्णयाप्रमाणे गरीब परिवारांना विनाडिपॉझिट
एलपीजी कनेक्शन देण्यात यावे ज्यांचे नाव लिस्ट नव्हते, जेव्हापासून
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत 18 डिसेंबर 2018 पूर्ण देशात 5.86 कोटी कनेक्शन या योजनेंतर्गत देण्यात आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एलपीजीचा
कव्हरेज 62 टक्के जो 2016 मध्ये होता,
आता तो 89.5 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
सांगली
जिल्ह्यात एकूण 91 हजार 020 गॅस कनेक्शन
दिले आहेत. त्यामध्ये इंडेन गॅस कंपनी ने 13 हजार 170, भारत गॅस कंपनी ने 28 हजार 823 तर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी ने
49 हजार 027 गॅस कनेक्शन दिले आहे. सांगली जिल्ह्याचा एलपीजी कव्हरेज हा 86 टक्क्यांवरून
91 टक्क्याला पोहोचला आहे. ज्या महिला पैशाअभावी
गॅस कनेक्शन घेऊ शकत नव्हत्या अशा 91.14 टक्के महिलांना भारत
सरकारकडून लोन देण्यात आहे, सगळ्यात महत्वाचे 91 हजार 020 जोडण्यापैकी 91 टक्के
महिला रिफिल घेता आहेत आणि पर कॅपिटा गॅसचा वापर हा 4.16 रिफिल
एवढा आहे ज्या महिला 14.2 ज्ञस चा रिफिल महाग पडतो म्हणून घेत
नव्हत्या, त्या महिलांच्या साठी 5 किलो
डोमेस्टिक सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये महिला
आपला 14.2 किलोचा खाली सिलिंडर डीलर ला परत करून 5 चा सिलिंडर घेऊ शकतात.
No comments:
Post a Comment