जत,(प्रतिनिधी)-
श्री यल्लमादेवीच्या
यात्रेत काल दुपारी दोन वाजता मंदिराचे पुजारी सुभाष कोळी यांनी किचात प्रवेश केल्यानंतर
यात्रेची सांगता झाली. यात्रेत चार लाख भाविकांनी हजेरी लावली
होती. बुधवारी सकाळी सात वाजता डफळे यांच्या वाड्यापासून वाजतगाजत
सवाद्य मिरवणुकीने दुपारी बारा वाजता श्री यल्लमा देवीच्या मंदिरासमोर पालखी आल्यानंतर
मंदिराला पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर मंदिरापासून पूर्वेला असलेल्या किचाच्या ठिकाणी
वाजतगाजत पालखी आली. यावेळी किचाच्या बाजूने डोक्यावरती आंबील
घेऊन महिलांनी पाच फेर्या घातल्या. त्यानंतर
मंदिराचे पुजारी सुभाष कोळी यांनीही सासनकाठ्यांसह पाच प्रदक्षिणा पूर्ण करून अखेर
किचात प्रवेश केला. यानंतर यात्रेची सांगता झाली.
यावेळी श्री यल्लामादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शार्दुलराजे
डफळे,
शहाजी जाधव, नाना शिंदे, बारीश शिंदे, कुमार इंगळे, गणपतराव
कोडग, सदाशिव जाधव, पापा सनदी उपस्थित होते.
जत येथील श्री यल्लम ादेवीच्या यात्रेत गेल्या चार दिवसांत चार लाख भाविकांनी
हजेरी लावली. यात्रेमधील अनेक व्यापार्यांचा चांगला व्यवसाय झाला. सांगली कृषी उत्पन्न बाजार
समितीच्यावतीने जनावरांचा बाजार भरविण्यात येते. याही वर्षी मोठ्या
प्रमाणात जनावरे यात्रास्थळी आले होते. यात्रास्थळी मोठ्या प्रमाणात
जणांची विक्री झाली असून तालुक्यात पडलेल्या दुष्काळामुळे अनेक जण कवडीमोल किमतीला
जनावरांची विक्री करत असताना दिसत होते. यावर्षी जत पोलीस ठाण्याच्यावतीने
125 पोलीस अधिकारी असा बंदोबस्त ठेवला होता. एकेरी
मार्ग तयार करून पार्किंगची चांगली व्यवस्था पोलिसांनी केली होती.
No comments:
Post a Comment