जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक महादेव धानाप्पा जेऊर यांची कनिष्ठ लेखापालपदी नुकतीच पदोन्नती झाली आहे. त्यांचा विविध संघटना व पदाधिकारी यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
महादेव जेऊर हे जत पंचायत समितीच्या लेखा विभागात कार्यरत आहेत. कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून नियुक्ति झाल्यानंतर सभापती सुशीला तावंशी, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, धन्वंतरी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अंजना साळुंखे, कर्मचारी संघटनेचे आर.डी.कांबळे, यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचारी उपस्थित त्यांचा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment