जिल्हा परिषद राज्यात पहिली;देशात अकरावी
सांगली,(प्रतिनिधी)-
केंद्र
सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियानात सांगली जिल्हा परिषदेने देशात
11 वा क्रमांक पटकावलेला आहे. नोव्हेंबर
2018 मध्ये ही स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. त्यात सांगली जिल्ह्याने टॉप 12 मध्ये स्थान मिळवत लौकिक
प्राप्त केलेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम सिंह देशमुख
आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी ही माहिती दिली.
केंद्र सरकारने देशातील ग्रामीण भागामध्ये स्वच्छता
मोहीम राबवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये शौचालयांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्यात आलेला आहे.
स्वच्छ गावांच्या पातळीवरती काम करण्यासाठी जिल्हा परिषदांनी या स्पर्धेमध्ये
सहभाग घेतला आहे. देशातील 25 राज्यातील
412 जिल्हे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आलीआहे,
त्यात सांगली जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवून प्रभावीपणे
काम केले. शौचालयाच्या वापरासाठी जनजागृती केली.
विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला शौचालय
उभारणी सहज सोपी व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. त्यफलश्रुती
म्हणून जिल्हा परिषदेला देशात 11 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
श्री. देशमुख म्हणाले, जिल्हा
परिषदेने घेतलेल्या कष्टाचे आणि त्याला ग्रामीण भागातील जनतेने दिलेल्या सहकार्याचे
हे फळ आहे. स्वच्छ भारत अभियान ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून
ती सामान्य जनतेसाठी तेवढीच उपयुक्त आहे. जिल्हा परिषद सर्व योजना
अतिशय गांभीर्याने राबवत असल्यामुळे त्याला राज्य आणि देशपातळीवर यश मिळत आहे.
आपला देशात अकरावा तर राज्यात पहिला क्रमांक आला असल्याने त्याचा आम्हाला
अभिमान आहे.
No comments:
Post a Comment