Tuesday, November 6, 2018

मारहाण करून एकास लुटले


जत,(प्रतिनिधी)-
जबरदस्तीने गाडी आडवून व लाथाबुक्यानी मारहाण करून दोन ग्राम सोने व रोख चार हजार पाचसे रुपये लंपास केल्याच्या आरोपावरून प्रकाश चव्हाण  याच्यासह सात जणांच्या  विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करुन त्यापैकी प्रकाश रुद्राप्पा चव्हाण ( वय ३० रा.सातारा रोड पारधी तांडा जत ) याला  अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान जत शहरातील जनावरे बाजार आवार परिसरात घडली. याप्रकरणी विठोबा दादासाहेब माने (वय ५० रा.दरीबडची ता.जत ) यानी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे . या प्रकरणातील इतर सहा संशयीत आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत .
       याबाबत अधिक माहिती अशी की , विठोबा माने व निवृत्ती आवटी हे ऊस तोडणी कामगार आहेत . छोटा हत्ती गाडी क्रमांक एम एच १० / सि आर ०७८१ मधून इतर  शेतमजुरासमवेत ते दरीबडची ते विटा असे जात असताना  प्रकाश चव्हाण  याच्यासह सात जणांनी  त्यांची गाडी आडवून त्यांना जबरदस्तीने जत जनावरे बाजारात नेले . माने याना मारहाण करून त्यांच्याकडील रोख चार हजार पाचसे रुपये काढून घेतले त्यानंतर आवटी यांच्या तोडावर व छातीवर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन ग्राम वजनाचे सोन्याचे ताईत हिसडा मारून तोडून काढून घेतले आहे . सदरची घटना घडल्यानंतर माने यानी जत पोलिसांना माहिती दिली होती . त्यानंतर पोलिसांनी शोध घेवून  प्रकाश चव्हाण या संशयीत चोरट्यास  अटक केली आहे. पुढील तपास  पोलीस उप निरीक्षक ए . डी . कत्ते करत आहेत .

No comments:

Post a Comment