जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील
पांढरेवाडी येथील मनोहर तम्माण्णा चव्हाण, भागाप्पा तांबे,
संभाजी करे, देवाप्पा पुजारी (सर्व रा. पांढरेवाडी) या चौघांनी
व अनोळखी तिघांनी शासकीय कामात अडथळा आणला. पांढरेवाडी हद्दीत
तलाठी गणेश संपतराव पवार हे शासकीय कामात असताना मोटारसायकल आडवी लावून काठ्या,
रस्त्यावरील दगड यांच्या सहाय्याने धाक दाखवून व जिवे मारण्याची धमकी
देऊन वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळवून नेल्याने त्यांच्यावर सरकारी कामात
अडथळा आणल्याचा गुन्हा उमदी पोलिसांत दाखल झाला आहे. ही घटना
नोंद असून मंगळवारी पांढरेवाडी येथे घडली. अधिक तपास पोलीस नाईक
खरात करीत आहेत.
No comments:
Post a Comment