Thursday, November 29, 2018

बेदाण्याला मिळाला 243 रुपयांपर्यंत चढा दर


सांगली,(प्रतिनिधी)-
दिवाळीपूर्वी बेदाणा दरात झालेली घसरण दिवाळीनंतरच्या पहिल्याच सौद्यात वाढली आहे. काल सांगली मार्केट यार्डात बेदाणा सौदे पार पडले. बेदाण्याला 243 रुपयांपर्यंत दर मिळाला. दरम्यान, बेदाण्याचे पेमेंट वेळेत न करणार्या (हिशोब चुकता न करणार्या) 15 व्यापार्यांवर बॅन आणण्याचा निर्णय सांगली तासगाव बेदाणा व्यापारी असोसिएशनच्यावतीने घेण्यात आला. मार्केट यार्डात दिवाळीनंतर पहिलाच बेदाणा सौदा झाला. सांगली मार्केटमध्ये 15 गाड्यांमधून 150 टन बेदाणा आवक झाली. पहिल्याच सौद्यामध्ये बेदाण्यास चढा भाव मिळाला.
दिवाळीपूर्वी हा बेदाणा भाव 210 रुपयांपर्यंत गेला होता. कालच्या पहिल्या सौद्यावेळी मात्र चांगल्या बेदाण्यास 243 रुपये दर मिळाला. या पहिल्याच सौद्यात ग्राहक-खरेदीदार उपस्थित होते. दिवाळीच्या सुट्टीत वर्षभरातील सर्व हिशोब पूर्ण करण्याचा नियम आहे. वर्षभरात ज्या शेतकर्यांकडून बेदाणा घेतलेला असतो, त्या सर्व शेतकर्यांचा हिशोब पूर्ण करीत सर्व पैसे भागवण्याचे असतात. दिवाळीनंतर सुरू होणार्या सौद्यापूर्वी पूर्वीचे कोणतेही देणे असता कामा नये; अन्यथा अशा व्यापार्यांना नवीन बेदाणा सौद्यात भाग घेता येणार नाही, असा नियम आहे. विश्वासार्हता टिकवण्यासाठी असा कटू निर्णय महत्त्वपूर्ण ठरतो. त्यानुसार पहिल्याच सौद्यावेळी याबाबत खात्री करण्यात आली. त्यामध्ये 15 व्यापार्यांनी दिवाळीपूर्वीचे देणे क्लिअर केले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या संबंधित 15 व्यापार्यांना कालच्या बेदाण्यात सौद्यात सहभाग घेण्यास बॅन घालण्यात आला.

No comments:

Post a Comment