जत,(प्रतिनिधी)-
मिरज तालुक्यातील बेडग येथील अर्जुन
मारुती सन्नके यांनी आपल्या दुकानाशेजारी सन 2013 मध्ये पिंपळाचे झाड लावले होते. त्या रोपांचा आता वृक्ष
तयार झाला आहे. स्वत: च्या मुलाचे आपण संगोपन
करतो, त्याप्रमाणे त्यांनी झाडाचा सांभाळ केला आहे. आपण आपल्या मुलांचा वाढदिवस ज्याप्रमाणे साजरा करतो, त्याचप्रमाणे त्यांनी त्या पिंपळाच्या वृक्षाचा सहावा वाढदिवस गुरुवारी साजरा
केला.
गावातील सर्व लोकांना निम ंत्रण देऊन, सर्वांना पर्यावरणाचा संदेश देऊन झाडाभोवती फुलांची माळ, रांगोळी काढून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राजाराम केंगारे, विनायक ओमासे,
रावसाहेब बोरगावे, विष्णू ओमासे, सचिन वाघमोडे, दीपक सूर्यवंशी, शंकर माळी, महादेव पाटील, बंडू
मडीवाळ, संजय वाघमोडे, अमोल जाधव,
तुकाराम सूर्यवंशी, आपासाहेब संपकाळ, मोतीलाल सन्नके आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment