जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात यावर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका पशुपालकांना बसला असून चार्यासाठी मेंढपाळांची दाहीदिशा भटकंती सुरू आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पशुपालकांतून होत आहे. जत तालुक्यात चारा छावण्याही सुरू नाहीत, त्यामुळे जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न मेंढपाळांमध्ये निर्माण झाला आहे.
यावर्षी पावसाचे चारही महिने पावसाअभावी निव्वळ कोरडे गेल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. जनावरांची संख्या लाखोंच्या घरात असून त्यांना चारा उपलब्ध नसल्याने कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे.
यावर्षी पावसाचे चारही महिने पावसाअभावी निव्वळ कोरडे गेल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. जनावरांची संख्या लाखोंच्या घरात असून त्यांना चारा उपलब्ध नसल्याने कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे.
जिल्हा परिषदतर्फे वैरण विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. परंतु चारा लावणार कधी आणि तो प्रत्यक्षात शेतकर्यांच्या दावणीवर मिळणार कधी यामुळे शेतकरी धास्तावला आहे. सरकारकडून तर रोज एक घोषणा होत आहे. प्रत्यक्षात यंत्रणेवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. टँकर देऊ, चारा देऊ, अशी फक्त घोषणाच केली जात आहे,परंतु त्याची अंमलबजावणी काहीच नसल्याने दुष्काळी उपाययोजनांचा बोजवारा उडाला आहे.
तालुक्याच्या काही भागात सध्या तर माळरानावर मेंढपाळांची भटकंती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यांना चार्याच्या शोधात गावोगावी फिरावे लागत आहे. जेथे मोकळे रान आहे तेथे मुक्कामासाठी जावे लागत आहे. केवळ मेंढ्याचाच नाही तर जनावरांनासुद्धा भटकंती करण्याची वेळ आली आहे. डफळापूर, साळमगेवाडी, बिळू र परिसरात हे चित्र दिसत आहे. मंत्री,लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पशुधनाची आकडेवारी जाहीर करून सुविधा पुरवू, असे पोकळ आश्वासन देत आहे. परंतु थेट स्थानिक पातळीवर काहीच हालचाली नसल्याने पशुपालकांचा जीव टांगणीला लागला आहे.
उपाययोजनांची अंमलबजावणी करा
आता रब्बी आणि खरीप दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. त्यामुळे शासनाकडे थेट मदत करण्याशिवाय पर्याय नाही. त्यादृष्टीने पावले टाकण्याची गरज आहे. केवळ चर्चा करून उपयोग नाही तर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची वेळ आहे, असे शेतकर्यांचे मत आहे.
No comments:
Post a Comment