Monday, November 26, 2018

जत शहरात चोरी


जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ राहत असलेल्या पार्वती भाऊसाहेब जाधव (वय 52) यांच्या घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून सोन्याचे दागिने, टीव्ही यासह सुमारे तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पार्वती या गावी गेल्या होत्या.त्यामुळे त्यांना चोरी झाल्याचे उशीराने कळले.

जत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पार्वती जाधव या 22 नोव्हेंबर रोजी त्यांच्या सांगलीतील बहीणीकडे गेल्या होत्या.त्यांचे पती जतमधील हॉटेल संस्कृतीमध्ये रखवालदार म्हणून काम करतात. दोघेही रात्री घरी नसल्याने चोरट्यांनी याचा फायदा घेऊन घर लुटले. चोरट्यांनी बाहेरून लावलेले कुलूप, कडी तोडून घरात प्रवेश केला. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी घरी आल्यावर त्यांना चोरी झाल्याचा उलगडा झाला. चोरीत कपाटात ठेवलेले दहा हजार रुपयांची कर्णफुले, एक एलईडी टीव्ही असा तीस हजाराचा ऐवज लंपास केला. जत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment