Saturday, November 24, 2018

जाडरबोबलाद सोसायटी अध्यक्ष विरोधातला अविश्वास ठराव मंजूर


जत,(प्रतिनिधी)-
जाडरबोबलाद सर्व सेवा सोसायटीचे अध्यक्ष प्रदिप धुमगोंड यांच्या विरोधात  दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत मंजूर झाला. विरोधकांचा कट उधळून लावला गेला , असे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
सोसायटी अध्यक्ष धुमगोंड यांच्या विरोधात दि.१७ नोव्हेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. तो दि. २२ नोव्हेंबर रोजी नऊ अधिक  चार अशा बहुमताने मंजूर करण्यात झाला आहे. काँग्रेस नेत्यांनी पैसे देऊन सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो निष्फळ ठरला आहे. त्यामुळे सदस्यांनी आमच्या विश्वासास पात्र राहून, गड कायम राखला असल्याचे रवी-पाटील यांनी सांगितले. 
    ते म्हणाले, ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच म्हणून सर्वांना एक वर्षाची संधी मिळावी. असे ठरले होते. यासाठी उपसरपंच पदी मागासवर्गीय समाजातील प्रकाश काटे यांना संधी दिली आहे. मात्र, अध्यक्ष प्रदिप धुमगोंड यांनी निवडीला विरोध करत काँग्रेसमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. यासाठी जाडरबोबलाद गटातील काँग्रेस नेते संतोष पाटील यांनी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. याला जातीय रंग देऊन माझी बदनामी करण्याचा विरोधकांचा डाव होता. तो हाणून पाडण्यात आला. 
     तर अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर तेरा पैकी नऊ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने राहीले. त्यामुळे विरोधकांना अपेक्षीत असलेला हेतू साध्य करता आलेला नाही. जाडरबोबलाद गटातील मतदार पूर्वापार आमच्या कुटुंबावर  विश्वास ठेवून समाजकारण असो किंवा राजकारण यात सोबत राहिले आहेत. त्यामुळे त्या -त्या घटकातील कार्यकर्त्यांना संधी देणे गरजेचे आहे. ते मी केले, त्यामुळे काही नाराजांनी याला विरोध केला. तरीही आपल्या भूमिकेत ठाम राहून मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांला न्याय दिला. 
   तर सदस्यांनी देखील आमच्या भूमिकेचे समर्थन करत प्रदिप धुमगोंड यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या बाजूने राहिले. त्यामुळे ग्रामपंचायत व सोसायटीला कोणतेही खिंडार पडले नसून आमचा गड लोकांच्या विश्वासवर कायम आहे.

No comments:

Post a Comment