Friday, November 30, 2018

गोबर, रूबेला लसीकरणाबाबत गैरसमज नको : अभिजित राऊत


सांगली : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्हाभरात सध्या गोवर, रूबेला लसीकरण मोहीम सुरू आहे. यामध्ये काही ठिकाणी मुलांमध्ये आरोग्यविषयक किरकोळ लक्षणे दिसून आलेली आहेत. मात्र ही लक्षणे निदर्शनास येणे नैसर्गिक आहे. त्यामुळे या लसीकरणाबाबत गैरसमज न करून घेता, याबाबतची माहिती घेणे उचित ठरणार असून पालकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

 ते म्हणाले, लस शरीरात गेल्यानंतर रोगाविरूध्द रोग प्रतिकारशक्ती तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेमध्ये किरकोळ ताप येणे, अंगावर पुरळ येणे, लस दिलेल्या ठिकाणी सुज येणे, अंगाला खाज सुटणे इत्यादी लक्षणे आढळून येऊ शकतात. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात दोन दिवसात 32 हजार 312 लाभार्थ्यांना गोअर रूबेलाची लस देण्यात आली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील 13 बालकांना अशाप्रकारची लक्षणे दिसून आलेली आहेत. लसीकरणासाठी जाणार्या सर्व पथकांमधील आरोग्य कमर् चारी व अधिकारी यांना संबंधित दुष्करिणामवर औषोधपचारसाठी लागणारा औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. या लसीकरणामुळे गोवर व रूबेला या दोन प्राणघातक व गंभीर आजारापासून बालके सुरक्षित होणार आहेत. सर्व पालकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता 9 ते 15 वर्षापर्यंतच्या बालकांना ही लस द्यावी व भावी पिढीला दोन प्राणघातक रोगांपासून वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन देखील जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख यांनी केले.

No comments:

Post a Comment