जत ,(प्रतिनिधी)-
स्पेन येथे झालेल्या जागतिक बाल बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जत तालुक्यातील संख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु.श्रेया हिप्परगी हिने 8 वर्षांखालील मुली गटामध्ये संपूर्ण जगामध्ये 14 वा क्रमांक पटकावला. ही स्पर्धा 15 नोव्हेंबर रोजी स्पेन येथे झाली.
या स्पर्धा यू-8, यू-10, यू-12 अशा 3विभागामध्ये मुली आणि खुल्या गटा मध्ये घेण्यात आली. या स्पर्धे मध्ये एकूण 56फेडेरेशन (देशा) मधल्या तब्बल 851 खेळाडूंनी भाग घेतला होता. यामधील 542 खेळाडूंनी खुल्या गटामध्ये तसेच 309 खेळाडूंनी मुलींच्या गटामध्ये भाग घेतला. श्रेयाचे जागतिक मानांकन1141 आहे. तसेच या स्पर्धे मध्ये तिला 25 वे मानांकन देण्यात आले होते. श्रेयाने स्पर्धेची सुरवात दमदार केली. तिने आपला पहिला सामना सहजरित्या जिंकला. तिचा दुसरा सामना स्पर्धा मानांकन क्रमांक 4 वर असलेल्या व जिचा जागतिक बुध्यांक वरचढ 1454 वर आहे अशा रशियन खेळाडू बरोबर होता. पण हा सामना देखील श्रेयाने मोठ्या जिद्दीने जिंकला. यानंतर स्पर्धा एक दिवस विपरीत वातावरण असल्या कारणाने स्थगित करण्यात आली होती.
श्रेयाने आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये मानांकन क्रमांक 11 असलेल्या कझाकिस्तानच्या खेळाडूलाही धूळ चारली. अशा प्रकारे 11सामन्यांमधून 7 विजय मिळवत श्रेयाने 7गुणांची कमाई करत 84 खेळाडूंमध्ये 14 वा क्रमांक पटकावला. तसेच ती भारतीय चमूमध्ये दुसर्या क्रमांका वर राहिली. या स्पर्धेमधील यशा मुळे तिचा जागतिक मानांकन 25 ने वाढून1166 होईल. अशा या गुणी मुलीला आगामी काळात मोठी संधी आहे,मात्र आर्थिक समस्यांमुळे ती या स्पर्धांमध्ये खेळण्यास असमर्थ आहे, सांगली जिल्ह्याचे नाव भारतातच नव्हे तर जगात उज्ज्वल करणार्या या मुलीला अर्थसहाय्यकाची गरज आहे. यासाठी प्रायोजक म्हणून साखर कारखान्यासारख्या संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment