शेतकर्यांमध्ये संताप;
सांगोल्याला पाणी देण्याचा घाट
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भाग सुजलाम् सुफलाम्
व्हावा,
यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांमुळे म्हैसाळ योजनेचा
जन्म झाला. मात्र जत तालुक्यातील 15 ते
20 गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी तालुक्यातील शेतकर्यांनी म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे पैसे भरूनही जत तालुक्याला पूर्ण क्षमतेने
पाणी येत नाही. त्यामुळे तालुक्यातील लोक तहानलेलेच राहिले आहेत.
म्हैसाळ योजनेतील अधिकार्यांच्या अनागोंदी कारभारामुळे 70 टक्के शेतकर्यांनी पाण्याचे पैसे न भरताही मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यात जात असल्यामुळे
जिल्हाधिकार्यांनी वेळीच दखल घेऊन दुष्काळी पट्ट्यातील जत तालुक्यासाठी
पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या तालुक्यातील अनेक
शेतकर्यांनी केली आहे. म्हैसाळ योजना ही
जत तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणारी योजना आहे सद्यःस्थितीला तालुक्याच्या
पश्चिम भागातील पंधरा ते वीस गावांत या योजनेचे पाणी येते.
या परिसरातील अनेक शेतकर्यांनी दीड ते दोन महिन्यांपूर्वी
रोख पैसे भरले असतानाही जेवढ्या क्षमतेने पाणी यायला पाहिजे, तेवढ्या क्षमतेने पाणी या तालुक्याला येत नाही. 20 ते
30 टक्के पाणी सध्या कॅनॉलमधून येत असून त्याचा कोणताही उपयोग या तालुक्याला
होत नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी म्हैसाळ योजनेचे सर्व अधिकारी,
पदाधिकार्यांच्या उपस्थितीत आमदार विलासराव जगताप
यांनी मॅरेथॉन बैठक घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना खडसावले
असून मिरज तालुक्यातून कर्नाटक हद्दीत जाणार्या पाण्याची चौकशी
करून संबंधित इंजिनिअरच्या पगारातून पैसे वसुली करावी, अशी मागणी
त्यांनी यावेळी केली आहे.
दुष्काळी
जत तालुक्यातून म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्यासाठी प्रचंड मागणी आहे. मात्र योजनाच परिपूर्ण नसल्याने ओढे आणि नाल्यातून शेतीला पाणी सोडले जात आहे.
पण शेतकर्यांच्या मागणीनुसार पाणी न सोडता मनमानी
कारभारा- नुसार पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या असून
तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांतील शेतकर्यांनी दीड ते दोन महिन्यांपूर्वी आगाऊ पैसे भरले आहेत. मात्र तरीसुद्धा या गावाला पाणी मिळत नाही. त्यामुळे
अनेक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
दोन दिवसांपूर्वी म्हैसाळ योजनेचे अधिकारी व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत येथील विश्रामगृहात बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार विलासराव जगताप यांनी तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या कामाची माहिती
अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून घेतली. येत्या दोन महिन्यांत संपूर्ण
कामे पूर्ण करून तालुक्यातील प्रत्येक तलावात पाणी सोडण्यासाठी त्यांनी सूचना केल्या.
तसेच म्हैसाळ योजनेचे सध्या येणारे पाणी हे केवळ 30 टक्के या तालुक्यात येत असून किमान 80 ते 90 टक्के आमच्या वाट्याचे पाणी या तालुक्याला देण्यात यावे, अशा शब्दांत त्यांनी कोल्हापूर विभागाचे अभियंता गुणाले यांना खडे बोल सुनावले.
50 टक्के पाणी सांगोला तालुक्याला सोडण्याचा घाट
सुरू आहे. जत तालुक्यात अगोदरच 30 टक्के
पाणी कॅनॉलमधून येत आहे, त्यामुळे जत परिसरातील तलाव भरण्यास
अवघड होत असून यातही म्हैसाळ योजनेचे अधिकार्यांनी
50 टक्के पाणी सांगोला तालुक्याला सोडण्याचा घाट घातला असून जोपर्यंत
पूर्ण क्षमतेने पाणी जत तालुक्याला येत नाही, तोपर्यंत सांगोला
तालुक्याला पाणी सोडणार नाही, असा निर्धार या परिसरातील अनेक
शेतकर्यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment