मुलीशी जबरदस्तीने विवाह करण्यासाठी
विवाहित महिलेचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना जत शहरात घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने प्रशांत प्रकाश पाटील याच्यासह
एका अनोळखी युवकाविरोधात जत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी
की, मुख्य बाजार पेठेतील एका व्यापार्याची व राजकीय कार्यकर्त्यांची पत्नी आठ दिवसांपूर्वी घरातून निघून गेल्याची
तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. पोलिसांनी तपास केला असता संबंधित
महिलेचे प्रशांत प्रकाश पाटील आणि आणखी एका अनोळखी युवकाने अपहरण केल्याचे उघडकीस आले.
ही महिला सोमवारी रात्री पोलिस स्टेशनमध्ये हजर झाली. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता प्रशांत पाटील याची संबंधित महिलेच्या मुलीशी
विवाह करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने अन्य एका सहकार्याच्या मदतीने 19 तारखेला मध्यरात्री दोन वाजता महिलेचे
अपहरण केलेयाबाबत सोमवारी रात्री उशीरा या महिलेने दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
अधिक तपास हवालदार कणसे करीत आहेत.
No comments:
Post a Comment