जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका
शिक्षक भारती संघटना ही शिक्षकांच्या प्रश्नाच्या मागणीसाठी
शनिवार, दि. 1 डिसेंबर रोजी एक दिवसीय धरणे
आंदोलन करणार असल्याचा इशारा जत तालुकाध्यक्ष अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी गटशिक्षणाधिकार्यांना निवेदनाद्वारा दिला आहे. जत तालुक्यातील
प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक भारतीच्या
जत शाखेकडून शिक्षण विभागास यापूर्वी निवेदने देण्यात आली होती.
तसेच गटशिक्षणाधिकारी व संबंधित लिपिक यांच्याबरोबर वारंवार तोंडी चर्चाही
केली होती. मात्र शिक्षकांचे प्रश्न
’जैसे थे’ आहेत. म्हणून सांगली
जिल्हा शिक्षक भारतीचे अध्यक्ष महेश शरनाथे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करत आहोत.
तरी तालुक्यातील शिक्षकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जत तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत यांनी दिली. तसेच निवेदनात शिक्षकांच्या सेवापुस्तिका अद्ययावत करण्यासाठी केंद्रस्तरीय
कॅम्प लावावा ही प्रमुख मागणी आहे. तसेच आंतरजिल्हा बदली व जिल्हांतर्गत
बदलीने जतमध्ये हजर झालेल्या शिक्षकांचे वेतन, फरक बिले;
तसेच अन्य शिक्षकांची वैद्यकीय बिले आदी अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. यावेळी कृष्णा पोळ, शौकत
नदाफ, अविनाश सुतार, मल्लय्या नांदगाव,
भाऊसाहेब महानोर, बाळासाहेब सोलनकर, विनोद कांबळे, दशरथ पुजारी, दयानंद
रजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment