जत,(प्रतिनिधी)-
केंद्र
सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या
सर्वांगीण विकासासाठी अर्थसाहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांकरिता 2018-19 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक
ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
30 नोव्हेंबरपर्यंत
हे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास पाठवण्याचे आवाहन
पुणे विभागाचे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी केले आहे. सन
2018-19 पासून प्रतिष्ठानकडून असमान निधी योजना सुधारित करण्यात आल्या
आहेत. सदर असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात
प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. त्या संदर्भातील नियम,
अटी व अर्जाचा नमुना
शासनाच्या या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
इच्छुकांनी अर्ज संकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावेत. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्ह्याच्या
ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी
संकेतस्थळाला भेट द्यावी.
उपरोक्त
योजनांचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणार्या अर्जाचा नमुना
सुधारित स्वरूपात असावा. अर्जामध्ये नमूद केलेल्या आवश्यक त्या
सर्व कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेमधील परिपूर्ण प्रस्ताव
चार प्रतींमध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दिनांक 30 नोव्हेंबरपर्यंत पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक
राठोड यांनी सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.
No comments:
Post a Comment