जत,(प्रतिनिधी)-
येळवी
(ता. जत) येथील तलावात
’म्हैसाळ’चे पाणी सोडावे म्हणून कृष्णा खोरे महामंडळाचे
उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. येत्या
दहा दिवसांत येळवी भागात पाणी दाखल होणार असल्याची माहिती सांगली कृषी उत्पन्न बाजार
समितीचे माजी प्रकाश जमदाडे यांनी दिली. पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाणी गावाजवळील परिसरात आल्याने शेतकरी जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
कोडगवस्तीजवळ पाणी आलेले येळवी तलावात पाणी सोडण्यासंदर्भात कार्यवाही
पूर्ण करून घेणार आहे. येळवी, सनमडी,
घोलेश्वर, मायथळ,
निगडी या परिसरात दुष्काळ तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. पिण्याच्या पाण्याची गंभीर प्रश्न आहे. याकरिता ‘म्हैसाळ’चे पाणी या भागात
नेल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. वायफळ
ते येळवीकडे जाणार्या मुख्य कालव्याचे काम पूर्णत्वास आले आहे.
या कामाची व ’म्हैसाळ’च्या पाणी वितरण व्यवस्थेची पाहणी प्रकाश जमदाडे यांनी केली. वायफळ ते घोलेश्वर मुख्य कॅनालची जमदाडे यांनी पाहणी
केली, यावेळी पंचायत समिती सदस्य रामण्णा जीवाण्णावर,
विलास पाटील, मिलिंद पाटील, मंगेश सावंत, अभय जमदाडे, राजू
चव्हाण, प्रवीण यादव उपस्थित होते. यावेळी
जमदाडे म्हणाले, कोडगवस्ती येथील कॅनॉल पासून येळवी तलावात पाणी
सोडण्याचे पाटबंधारे विभागाचे नियोजन केले आहे. याबाबत खासदार
संजय पाटील, आमदार विलासराव जगताप यांच्याशी सकारात्मक चर्चा
झाली आहे.
No comments:
Post a Comment