Saturday, November 17, 2018

व्हॉट्सअ‍ॅपवरील मूर्ख लोकांची लक्षणे


 मूर्ख : फ्री मध्ये बॅलन्समोबाइलपेनड्राइव्हटि शर्ट मिळेलअसे मेसेज फॉरवर्ड करणारे. (फक्त लिंक वर क्लिक करा आणि क्लिक करतच रहा व नेटपॅक संपवाशिवाय या वस्तू कधीच कोणाला भेटल्या नाहीत.)
काही वेडे : ही मुलगी हरवली आहेहिला हिच्या घरी पोहचवाया मध्ये कुठेही तारखेचा उल्लेख नसतोमुलीच्या आई वडिलांचा फोन नंबरपत्ता नसतोफोन नंबर असलाच तर लागत नसतोआला मेसेज की लागले फॉरवर्ड करायला!
अतीवेडे : ॅक्सिडेंटच्या बातम्याफोटो पाठवतातजे की दोन तीन वर्षाआधी झालेले असतातयात कधीच तारीख नसतेआयुष्यभर फॉरवर्ड करतात.
बावळट : कोणत्याही देवाचा फोटोसंदेश , पत्ते, 108 वेळा लिहा, 121 वेळा लिहा असे लिहूनफॉरवर्ड नाही केले तर वाईट बातमी मिळेलअशी धमकी देऊन लोकांना फॉरवर्ड करायला सांगाणारेकाय होदेव कृपाळू आहेत्याला व्हिलन का बनवताय?
मंदबुद्धि : पुजारी मंदिरात पूजा करत होता नंतर एक सापमाकड आला आणि त्याने माणसाचे रूप घेतले हा मेसेज पाठवा लॉटरी लागेल. (अरे मूर्खातुझीच नाही लागली तर आमची काय लागणार?)
काही दीड शहाणे : आताच जन्माला आलेल्या मुलाच्या गळ्यात पिन फसली आहे ऑपरेशनला 50 लाख लागणारबायपास 10 लाखात होतेकोणत्या ऑपरेशनला 50 लाख लागतात भाऊ?
अती शहाणे : अशाच प्रकारे भावूकहृदयद्रावक मेसेज टाकून सांगतात की फॉरवर्ड करायामुळे प्रति शेअरिंग 50 पैसे व्हॉट्सअप कडून मिळतीलकधी मिळणारकसे मिळणार ?कोण व्हॉट्सअपचा माणूस पैसे आणून देणारऑफिस कुठे आहे व्हॉट्सअपचंमाहित आहे का?
बेअक्कल : मेसेज पुढे पाठवा बॅटरी फुल चार्ज होईल किंवा कुलूप उघडेल (म्हणजे फिजीक्स नावाची काही गोष्ट आहे की नाही?)
जडबुद्धी : एखाद्याचे महत्वाचे डॉक्यूमेंट सापडले आहेतहा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. (अरेडॉक्यूमेंट वर त्याचा पत्ता आणि नंबर नाही काते आधी नीट बघा.
अजून काही वेडेपणा : आज दुपारी 12:30 ते 3:30 यावेळेत कॉस्मो किरणे मंगळावरुन पृथ्वीवर प्रवेश करणार आहेतयावेळेत तुमचा मोबाईल शक्यतो स्विच ऑफ ठेवा आणि शरीरापासून दूर ठेवा कारण काँस्मो किरणे खुपच घातक ठरु शकतात अस ‘नासानी बीबीसी न्यूजचॅनेलवर थोड्या वेळापूर्वी जाहीर केलंयम्हणजे जणू काही हे येडं बीबीसी हे इंग्लिश चॅनेल रात्रंदिवस पाहत असतात आणि हे असे मेसेज पोस्ट करून वर सांगितातजास्तीत जास्त शेयर करा किंवा हा मेसेज सगळ्या ग्रुप वर पाठवालगेच पाठवा (जसं काही सगळ्या जगाची काळजी या मूर्खांवरच पडली आहे. ) तेव्हाफालतू मेसेज पाठवून स्वतःचा आणि दुसर्यांचा वेळ वाया घालवू नका आणि मोबाईलला कचरा पेटी नका बनवू.!
 *****
 साप घरावर दिसला कीलोक त्याला दांडक्याने मारतातपण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजताततात्पर्य : लोक सन्मान तुमचा नाही तरतुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात.
 *****
देवाने प्रत्येकाचं आयुष्य कसं छानपणे रंगवलंयआभारी आहे मी देवाचा कारण माझं आयुष्य रंगवताना देवाने... तुमच्यासारख्या माणसांचा रंग माझ्या आयुष्यात भरलाय.
 *****
अहोतुम्ही कुठे आहातआफीसमध्येच आहात नाघाबरल्या आवाजात बायकोने फोनवर नवर्याला विचारले. ‘हो... ऑफीसमधेच आहे मीकाकाय झाले?‘ नवर्याने कळवळून विचारले. ‘नाहीकाही विशेष झालं नाही.... आपली कामवाली बाई कोणाबरतरी पळून गेली आहे म्हणे.... असं तिचा नवरा रडत सांगत आला आहे... म्हणून तुम्ही कुठे आहात हे विचारायला फोन केला...एवढंच...!

दोन दोस्त गप्पा मारत असतात...
पिंट्या : मला माझ्या गर्लफ्रेंडला एक सॉलिड गिफ्ट द्यायचं आहेकाय देऊ सांग ना.
बंड्या : असं कर... मस्तपैकी सोन्याची रिंग घे आणि ती दे.
 पिंट्या : छे... छे... हे असलं बारीक काय नकोएकदम मोठंभक्कम असं काही तरी द्यायचंय.
बंड्या : हो कामग एक काम करट्रकचा टायरच दे!


No comments:

Post a Comment