सांगली,(प्रतिनिधी)-
अपंग घटकांतील
प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न
करण्यात येत आहेत. अभिनव संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवून शाळा,
महाविद्यालयांनीही 3 डिसेंबर रोजी अपंग दिनी दिव्यांग
मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिले.
3 डिसेंबर
हा अपंग दिन म्हणून साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत
ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला,
समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, विविध शाळा, महाविद्यालयांचे प्रतिनिधी, निवडणूक साक्षरता क्लब प्रतिनिधी (ईएलसी), दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आगामी लोकसभा
निवडणुकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने केंद्रीय निवडणूक आयोगाने
’सुलभ निवडणुका’ हे व ‘मतदार
असल्याचा अभिमान - मतदानासाठी सज्ज ’ घोषवाक्य
जाहीर केले आहे. त्यानुसार अपंग घटकातील मतदाराला निवडणूक प्रक्रियेत
सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने
अपंग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा,
या उद्देशाने 3 डिसेंबर रोजी अपंग दिन साजरा करण्यात
येत आहे.
यानिमित्त जिल्हा मुख्यालय, शाळा, महाविद्यालये, जिल्ह्यातील
सर्व मतदान केंद्रे आदी विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात
येणार आहेत. अपंग दिनानिमित्त महाविद्यालयांनी पथनाट्य,
प्रश्नमंजुषा, रॅली,
पोस्टर प्रदर्शन, व्याख्यान आदी विविध माध्यम ांतून
अपंग मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, असे सांगून
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले,
चांगले काम करणार्या जिल्ह्यातील विविध महाविद्यालयामध्ये
’ईव्हीएम’ हाताळणी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात
येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अपंग मतदार
दिनाच्या निमित्ताने 3 डिसेंबर रोजी जिल्हा मुख्यालयात जिल्हा
नियोजन समिती सभागृह येथे दुपारी 1 वाजता कार्यक्रम आयोजित केला
आहे.
No comments:
Post a Comment